
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळीतील विविध विकासकामांची पाहणी करत आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांनी महालक्ष्मी केबल पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच अॅनी बेझंट- ई मोझेस रोड कनेक्टर आणि वरळी-शिवडी कनेक्टरची पाहणी केली. यावेळी शिवसेना आमदार सुनिल शिंदेही उपस्थित होते.































































