
अभिनेत्री अनन्या पांडे ही वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. कधी नेपोटिझमवरून तर कधी तिच्या अभिनयावरून ती नेहमी चर्चेत असते. सध्या तिची चर्चा भलत्याच कारणावरून सुरू आहे. ते कारण म्हणजे तिचं फोटो शूट. लिंबू रंगाच्या साडीत तिने केलेलं फोटोशूट चांगलंच गाजत आहे. हॉल्टर नेक ब्लाऊज, स्टेटमेंट इअररिंग्ज आणि कुंदन बांगड्या यांनी तिने स्वतःचा लूक पूर्ण केला आहे.






























































