Photo – मुंबईच्या नभांगणात अवतरली महाराष्ट्राची संस्कृती; 2000 ड्रोनचा नेत्रदीपक सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सर्व फोटो - रुपेश जाधव

मुंबईतील आझाद मैदान येथे राम नवमीच्या दिवशी सायंकाळी भव्य ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा मागोवा घेणारा 2000 ड्रोनचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला.

ड्रोनच्या मदतीने मुंबईकरांना आकाशात साकारलेल्या विविध कलात्मक आकृती पाहायला मिळाल्या.

महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक पैलूंचा तेजस्वी आणि देखणा आविष्कार मुंबईकरांना अनुभवायला मिळाला.

या सोहळ्याने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची झलक अत्यंत प्रभावीपणे सादर केली.