1 / 5
गुलाब जल परिणामकारक आणि थंडावा देण्याचे काम करते. दोन मोठे चमचे गुलाब जलात काही मिनिट कापसाचे बोळे भिजत ठेवून नंतर भिजलेले कापसाचे बोळे डोळ्यावर ठेवा. पंधरा मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. या उपायाने डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर होतील.
कोरफडीची जेल त्वचेतील ओलावा राखण्यासाठी आणि पोषण देण्यासाठी प्रभावी आहे. कोरफडीचे ताजे पान घेऊन त्यातला गर काढा. डोळ्याखाली कोरफडीचा गर लावा आणि हळूहळू मालिश करा. यानंतर 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. 10 मिनिटानंतर यास कापसाच्या मदतीने स्वच्छ करा.
काकडी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्या काकडीच्या गोल चकत्या करून डोळ्यावर ठेवाव्यात. त्यामुळे काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते.

























































