1 / 7
अभिनयाचे महामेरू असलेले डॉ. श्रीराम लागू यांचे नुकतेच निधन झाले. अभिनयाकडे वळण्यापूर्वी ते कान-नाक-घसा (ENT) चे तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. डॉ. लांगूप्रमाणेच मराठीत असेही डॉक्टर आहेत, ज्यांनी वैद्यकीय क्षेत्राकडून अभिनय क्षेत्राची वाटचाल केली.
डॉ. काशिनाथ घाणेकर - अभिनेते डॉ. घाणेकर हे दंत शल्यविशारद म्हणजेच Dental Surgeon म्हणून प्रॅक्टिस करत होते.
सामना, सिंहासन, उंबरठा यांसारखे दमदार चित्रपट दिग्दर्शित करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल हे बालरोग तज्ज्ञ (pediatrician) आहेत.
निशांत, मंथन, सिंहासन, आक्रोश, जैत रे जैत अशा गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे डॉ. मोहन आगाशे हे मानसोपचार तज्ज्ञ (psychiatrist) आहेत.
सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या अगबाई सासुबाई या मालिकेत झळकणारे डॉ. गिरीश ओक यांनी आयुर्वेदात आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

























































