1 / 12
सुषमा स्वराज (माहेरचे नाव शर्मा) यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 ला अंबाला येथे झाला. हरदेव शर्मा आणि श्रीमती लक्ष्मी देवी असे त्यांच्या आईवडिलांचे नाव.
सुषमा स्वराज यांनी 1977 ते 82 आणि 1987 ते 90 पर्यंत हरियाणा विधानसभेच्या आमदार म्हणून काम केलं. 1977-79 दरम्यान सुषमांनी हरियाणा सरकारमध्ये विविध मंत्रिपदं सांभाळली.
सुषमा स्वराज यांनी दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून 13 ऑक्टोबर 1998 पासून 3 डिसेंबर 1998 पर्यंत म्हणून काम केलं.
संसदेचे सदस्य म्हणून सुषमा स्वराज सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत.
1996 मध्ये सुषमा स्वराज पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या. या दरम्यान त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिलं.
सुषमा स्वराज 26 मे 2014 ते 2019 पर्यंत त्या हिंदुस्थानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यतत्पर्तेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा नावाचा चांगलाच दबदबा होता.
2004 मध्ये जेव्हा सोनिया गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसनं पुढं आणलं तेव्हा सुषमा स्वराज यांनी त्याचा खूप विरोध केला.
सुषमा स्वराज यांनी 1999मध्ये कर्नाटकच्या बेल्लारी मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवली. त्या वेळी त्या हरल्या मात्र तेव्हा पासून राजकारणात त्यांची प्रकर्षाने ओळख निर्माण झाली.

























































