Photo – कॅरेमल चॉकलेट! गोड कॅप्शनसह सईने शेअर केले मोहक फोटो

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामधून लोकांच्या भेटीला येत असते. त्यातले तिचे अनेक लूक चर्चेचा विषय असतात. असाच एक लूक शेअर करून सईने त्यावर कॅरेमल चॉकलेट अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोत सईने रेट्रो लूकचा टू पीस ड्रेस घातला आहे. हलक्या चॉकलेटी रंगाच्या या ड्रेससोबत तिने सटल न्यूड मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे.