फोटो स्टुडिओ दुकानाला आग लागून 25 लाखांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, औसा

शहराच्या मध्यवर्ती भागात कोर्टाच्या समोर असलेल्या न्यु. महालक्ष्मी डिजीटल फोटो स्टुडिओ दुकानाला आग लागून जवळपास 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत आधिक माहिती अशी की, कोर्टाच्या समोरील बाजूस स्वामी कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या दहा वर्षांपासून न्यू महालक्ष्मी डिजीटल फोटो स्टुडिओ चालू आहे. सोमवार 27 रोजी भरदुपारी 12 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागून 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या आगीत डिजीटल प्रिटींग मशीन फोर कलर, रिसो ऑफसेट मशीन, कॉम्प्युटर चार नग, कॅमेरा फोटो व शुटींग, फोटोग्राफी साहित्य, रबर स्टॅम्प मशीन, फोटो प्रिंटर, झेरॉक्स मशीन, कोऱ्या पत्रिका व कागद आदी साहित्य व फर्निचर शिवाय दुकानात असलेले सर्व साहित्य झळून खाक झाले आहे. जवळपास 25 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दुकानाचे मालक विनय पिंगळे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात उल्लेख केला आहे.