
शिवसेना भवन येथे मुंबईतील महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते अंबादास दानवे, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेत्या माजी महापौर विशाखा राऊत, उपनेते माजी महापौर मिलिंद वैद्य, उपनेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.