
सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका सध्या रंगात आली आहे. आता या मालिकेतील सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा तरुणपणीचा प्रवास सुरू झाला आहे.

त्यामुळे आता जुन्या कलाकारांची जागा नवीन कलाकारांनी घेतली असून सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजसी भावे तर महात्मा फुलेंच्या भूमिकेत अभिषेक देशमुख दिसणार आहेत.




























































