पाहा व्हिडिओ : जखमी कासवावर डहाणूच्या कासव शुश्रूषा केंद्रात फिजिओथेरपी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । डहाणू

पालघर जिल्ह्यातील वसई येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या ऑलिव रिडले जातीच्या कासवावर डहाणू कासव पुनर्वसन शुश्रूषा केंद्रामध्ये फिजिओथेरपी देऊन उपचार करण्यात आले. या कासवाचा एक पाय हालचाल करत नव्हता. त्यामुळे पालघर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक आणि डब्ल्यूसीएडब्ल्यूए संस्थेचे संस्थापक धवल कंसारा आणि डॉक्टर दिनेश विन्हेरकर यांनी जखमी कासवावर फिजिओथेरपी करण्याचे ठरविले. फिजिओथेरपी करण्यात आल्याने कासव आता उत्तमरित्या पोहत आहे.

वसईत 1 ऑगस्ट 2018 रोजी हे कासव सापडले होते. समुद्री कासवावर फिजिओथेरपी करण्याचा हा हिंदुस्थानातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा डब्ल्यूसीएडब्ल्यूए संस्थे कडून करण्यात आला आहे. डहाणू येथील कासव पुनर्वसन आणि शुश्रूषा केंद्रात 2 महीने उत्तम रित्या उपचार घेऊन जखमी कासव बरे झाले आहे. ते आता चांगल्या प्रकारे पोहू शकते. त्यामुळे या कासवाला माइक्रो चिप लावून काही दिवसात समुद्रात सोडण्यात येणार आहे.