पिंपरीत चार दिवसात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नाही

675

पिंपरी-चिंचवड शहरात मागील चार दिवसात एकही नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. शहरात आजपर्यंत 20 रुग्ण आढळले होते. त्यापैकी बारा बरे झाले आहेत. आठ बाधित रुग्णांवर वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत. तर, महापालिकेने साडेसात लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले असून परदेशातून आलेल्या 1873 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 587 ५८७ व्यक्तींचे कोरोना तपासणीकरिता घशातील द्रावांचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आजअखेर 541 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरित अहवाल प्रलंबित आहेत. तसेच आज (बुधवारी) 26 कोरोना संशयितांना वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत.

शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आजपर्यंतची संख्या 1873 आहे. या सर्वांनी किमान 14 दिवसांसाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28 दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.

आजचा अहवाल

दाखल झालेले संशयित रुग्ण – 26

पॉझिटीव्ह रुग्ण – 0

निगेटीव्ह रुग्णांची संख्या – 32

चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण संख्या – 26

रुग्णालयात दाखल रुग्ण – 34

डिस्चार्च झालेले रुग्ण – 34

सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – सात लाख 47 हजार 249

आपली प्रतिक्रिया द्या