झाडाची फांदी तोडण्यावरून टोळक्याची दाम्पत्याला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झाडाची फांदी तोडण्याच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने दाम्पत्याला मारहण केली. ही घटना फुगेवाडी येथे घडली. लक्ष्मण भिमराव कांबळे (वय ५२), चंद्रकला लक्ष्मण कांबळे (वय 45), विजया कमलेश पटेल (वय 33), अंजली उर्फ कांचन लक्ष्मण कांबळे (वय 30), सुहास लक्ष्मण कांबळे (वय 28, सर्व रा. आनंदवन कुष्ठ वसाहत, फुगेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. लता अनिल कांबळे (वय 33) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी लता यांच्या घरासमोरील उंबराचे झाड तोडण्यावरून आरोपींसोबत त्यांचे वाद झाले. यातून आरोपींनी लता आणि तयांचे पती अनिल यांना मारहाण केली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आदेश असताना आदेशाचे उल्लंघन केले. सहायक पोलीस निरीक्षक बनसोडे तपास करत आहेत.