पिंपरी चिंचवड – दिल्लीतून आलेल्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील सहाजण महापालिका रुग्णालयात

803

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 नागरिकांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या आणखी सहा जणांना आज (गुरुवारी) महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने ‘एनआयव्हीकडे’ तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, दिल्लीतून आलेल्यापैकी दोघे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या चारवर गेली आहे.

दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तबलीगी जमात या संघटनेच्या वतीने तबलीगी जमात हा कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. कार्यक्रमातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 23 नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या 23 नागरिकांसह त्यांचे 5 नातेवाईक असे 28 संशयितांना महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे नमुने बुधवारी तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले होते. त्याचे आज रिपोर्ट आले असून 28 पैकी दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, बाकीचे 26 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या