
सामना प्रतिनिधी । पिंपरी
पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपला राजीनामा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, अनुप मोरे, प्रवक्ते अमोल थोरात, प्रमोद निसल, कमल घोलप, उत्तम केजळे, कैलास बारणे, सचिन चिखले आदी उपस्थित होते.






























































