पिझ्झा डिलिव्हरी बॉयला लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडील रोकड आणि मोबाइल असा ७३८० रुपयांचा ऐवज दोघांनी लुटला. मांजरी येथील झेड कॉर्नर येथे मध्यरात्री ही घटना घडली.

अभिजित भोसले (वय ३०, रा. हडपसर) यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २७ मे रोजी ही घटना घडली. अभिजित भोसले हा पिझ्झा सेंटरमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो पिझ्झाची ऑर्डर देण्याकरिता मांजरी-केशवनगर रस्त्याने निघाला होता. यावेळी दोघांनी त्याच्याकडील २५८० रुपयांची रोकड व एक मोबाइल असा ७३८० रुपयांचा ऐवज जबरस्तीने हिसका मारून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एच. बी. खोपडे तपास करत आहेत.