इंदापूरजवळ विमान कोसळले, वैमानिक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन, पुणे

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक विमान कोसळले आहे. रूई गावातील श्री बाबीर विद्यालय नजीक मंगळवार दुपारी बारा ते सवा बारा सुमारास ही दुर्घटना घडली आहे. हे शिकाऊ विमान  असून ते बारामतीहून निघाले होते असं सांगण्यात आलं आहे. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.  हे विमान 3500 फूट उंचीवरून कोसळल्याने शिकाऊ वैमानिक जखमी झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने त्याला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सिध्दार्थ टायटस असं या वैमानिकाचे नाव असल्याचं कळतंय