
1 सध्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टूगेदर जोरात सुरू आहे. अनेक शाळा आपल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा म्हणजेच गेट टूगेदरचा कार्यक्रम आयोजित करत आहेत.
2 गेट टूगेदरचे बोलावणे आले तर सर्वात आधी आमंत्रणामध्ये तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर आवश्यक तपशील तपासा. तुम्ही उपस्थित राहणार असाल, तर वेळेवर पोहोचा.
3 वेळेवर पोहोचण्यासाठी आणि ऐनवेळी धावपळ टाळण्यासाठी कपडे, जाण्याचा मार्ग आणि इतर गोष्टींची तयारी आधीच करा. नवीन लोकांशी बोला, जुन्या मित्रांशी गप्पा मारा, कार्यक्रमाचा आनंद घ्या.
4 जर तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली, तर आत्मविश्वासपूर्ण आवाजात बोला. भाषण लहान आणि प्रभावशाली ठेवा व त्यात काहीतरी नवीन माहिती किंवा अनुभव सांगा.
5 तुम्ही जाऊ शकत नसाल तर आयोजकांना लवकर कळवा. यामुळे त्यांना नियोजन करण्यास मदत होईल. शक्य असल्यास कोणत्या कारणामुळे येऊ शकत नाही, हेही सांगा.


























































