‘प्लास्टिवर्ल्ड’ला 19 जानेवारीपासून होणार सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील तब्बल 68 देशांतील कंपन्यांच्या सहभागातून एक हजार कोटींच्या उलाढालीची अपेक्षा असलेल्या आणि तब्बल 12 हजार ग्राहकांची नोंदणी झालेल्या प्लास्टिवर्ल्ड या प्लॅस्टिक पॅकेजिंगसंर्दभातील सर्वाधिक मोठ्या जागतिक व्हर्च्युअल प्रदर्शनास उद्या 19 जानेवारी 2021 पासून सुरुवात होत आहे.

हे महाप्रदर्शन अखिल भारतीय प्लॅस्टिक उत्पादक संघटनेने (एआयपीएमए) आयोजित केले असून पाच दिवस चालणार आहे.  या मेगाप्रदर्शनास केंद्रीय रसायन आणि पेट्रोकेमिकल मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, केंद्र सरकार, सीआयपीईटी आणि देशातील 15 प्रमुख संघटना आणि संस्थांचे सहकार्य लाभले असल्याचे प्लास्टिवर्ल्डचे अध्यक्ष अजय देसाई यांनी दिली.