पोलिसांची खाती अॅक्सिस बँकेत वळवली, मुख्यमंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका

4149

पोलिसांची पगार खाती तसेच अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची खाती राष्ट्रीयीकृत बँकेतून ऑक्सिस बँकेत वळवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ऑक्सिस बँकेत पत्नी उच्च पदावर असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, असा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मोहनीश जबलपूर यांनीही 11 मे 2017 रोजी ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नागपूर खंडपीठात लवकरच सुनावणी होणार आहे. ऑक्सिस बँकेत खाती वळवण्याप्रकरणी राज्य सरकारने काढलेले सर्व परिपत्रक मागे घ्यावेत. याप्रकरणी ऑक्सिस बँक आणि सरकार यांच्यामध्ये झालेल्या कराराविषयी उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या