
सामना ऑनलाईन । दरभंगा
शेजारी राष्ट्रात दहशतवादाची फॅक्टरी आहे आणि विरोधक म्हणतात की निवडणुकीचा मुद्दा नाही. तुमचे एक मत हा दहशतवाद संपकू शकते आणि यासाठी तुम्ही चौकीदाराला पाठिंबा दिला पाहिजे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या दरभंगा येथील सभेत बोलताना केले.
‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ हीच आमची शक्ती आहे. पण काही लोकांना यापासून अडचण आहे. या देशातील विरोधकांना दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा वाटत नाही. पण दहशतवाद ही एक मोठी समस्या असून यामध्ये गरीबांचे सर्काधिक नुकसान होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे असे सांगत मोदी यांनी केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधानांच्या शर्यतीत जितके चेहरे आहेत त्यातील कोण दहशतवाद संपकू शकतो, असा प्रश्न त्यांनी केला. दहशतवादाने श्रीलंकेत 350 लोकांचे प्राण घेतले, मग हा महत्वाचा मुद्दा ठरत नाही का? आपल्या शेजारी राष्ट्रात तर दहशतवाद्यांची फॅक्टरी सुरू आहे. त्यांना योग्य धडा शिकवायचा असेल तर या देशात मजबूत सरकार प्रस्थापित होणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमचे एक मत महत्त्वाचे असल्याचे सांगत दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भाजप तसेच एनडीएला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
घराघरात पाणी पोहचवणार
गेल्या पाच वर्षांत घराघरांमध्ये कीज पोहचकली आणि पुढच्या पाच वर्षांत पाणी पोहचकण्याचे काम भाजपच्या नेतृत्वातील सरकार करेल. त्यासाठी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे. 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सरकार काम करत असून ‘शेतकरी सन्मान समृद्धी’ योजनेचा लाभही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

























































