पंतप्रधान मोदी यांची मालमत्ता 2.28 कोटींची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालमत्तेचा तपशील सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केला. पंतप्रधान मोदी यांची एकूण मालमत्ता 2.28 कोटी रुपयांची असून त्यांच्याकडे सध्या 48 हजार 944 रुपये एवढीच रोकड आहे. मोदी यांच्या मालकीचे एकही दुचाकी अथवा चारचाकी वाहन नसून त्यांनी आपली गुंतवणूक सुरक्षित बचत योजनांत केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सोने अथवा सोन्याच्या अलंकारांची खरेदी केलेली नाही. त्यांच्याकडे आता प्रत्येकी 45 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठय़ा असून त्यांची किंमत 1 लाख 38 हजार रुपये आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर गेल्या चार वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या संपत्तीत 75 लाख रुपयांची वाढ झाली आहे. 2002 मध्ये त्यांनी गुजरातमध्ये 3531.45 चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला होता. ज्याची किंमत तेव्हा एक लाख रुपये होती.