सपा बसपाची खोटी मैत्री तुटणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

25

सामना ऑनलाईन । लखनौ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपच्या युतीवर जोरदार टीका केली. यांची मैत्री 23 मे रोजी तुटनार आणि 23 मे नंतर ते एकमेकांना गेस्ट हाऊस कांडची आठवण काढणार असेही ते यावेळी म्हणाले. उत्तर प्रदेशाच्या एटामधी एका सभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले की, “उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी एक मैत्री झाली होती. निवडणूक झाली मैत्री संपली. त्या मैत्रीचे रुपांतर शत्रुत्वात झाले होते. आता पुन्हा एक मैत्री झाली आहे. परंतु ही मैत्री एका तारखेला तुटणार आहे.” 23 मे रोजी ही खोटी मैत्री तुटणार आहे असे भाकीत मोदींनी केले.

तसेच 23 तारखेला आत्या भाचा यांच्यातील शत्रुत्व भाग दोन सुरू होईल, एकमेकांना गेस्ट हाऊस कांडची आठवण करून देतील असेही मोदे म्हणाले.

मोदींनी सपा आणि बसपाच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी म्हणाले की,“उत्तर प्रदेशमध्ये सरकारे बदलत होती तशी गुंड आणि टोळी बदलत होते. शेतकरी, दुकानदार आणि व्यापार्‍यांना दुवसा ढवळ्या लूट होत होती. आत्याच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाला आणि  भाचाच्या कार्यकाळात दलितांवर अत्याचार झाले हे सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. दलितांवर अत्याचार कोणी केले हा प्रश्न जर मी मायवतींना विचारला तर त्यांना उत्तर देणे जमणार नाही.” ज्यांनी दलितांवर अत्याचार केले त्यांच्यासाठीच मायावती मतं मागत आहेत असा घाणाघातही मोदींनी यावेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या