
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि पुतीन यांना हिंदुस्थान भेटीचे निमंत्रण दिले. द्विपक्षीय करार अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पुतीन यांच्याशी चर्चा झाली. दोन्ही देशांमधील भागीदारी आणि व्यापार कराराबद्दल दोघांनीही कटिबद्धता दाखवली, असे मोदींनी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून सांगितले.