पंतप्रधानांची झोप उडेल, इंडिया आघाडीची नाही; केसी वेणुगोपाल यांचे मोदींना प्रत्युत्तर

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केरळ येथील तिरुअनंतपुरममध्ये सागरी बंदरचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका करत म्हटलं होतं की, “आजचा कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल.” यालाच आता प्रत्युत्तर देत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी हल्लाबोल केला आणि म्हटले की, “पंतप्रधानांची झोप उडेल, इंडिया आघाडीची नाही.”

केसी वेणुगोपाल म्हणाले, “पंतप्रधान असे का बोलत आहेत, हे मला माहित नाही. मात्र ज्यांची रात्री झोप उडेल ते पंतप्रधान असतील, इंडिया आघाडी, राहुल गांधी किंवा काँग्रेसची नाही. जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्यावर जास्तीत जास्त दबाव आणणार आहोत. त्यांनी महिला आरक्षण विधेयकाप्रमाणे ही घोषणा केली. आम्ही शांतपणे झोपू शकू, पण पंतप्रधानांना झोप येणं कठीण होणार आहे.”