
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी केलेल्या शेवटच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर…
>बीसी म्हणजे बिफोर कॉन्ग्रेस आणि एडी म्हणजे आफ्टर डायनॅस्टी – मोदी
>काँग्रेसपूर्वी आणि काँग्रेसनंतरच देश असंच विरोधकांचं म्हणणं – मोदी
>हिंदुस्थानची अर्थव्यवस्था आज जगात 6 व्या क्रमांकावर आहे – मोदी
>मोदींना वाईट म्हणा, भाजपाला वाईट म्हणा, पण हे करता करता देशाला वाईट म्हणू नका – मोदी
>काँग्रेस सरकार हे रिमोटकंट्रोलवाले सरकार होते – मोदी
>आम्ही आत आणि बाहेर दोन्हीकडे खरे बोलतो – मोदी
>काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंना लगावला टोला
>काँग्रेसने लष्कराचा अपमान केला, लष्करप्रमुखाला गुंड म्हटले – मोदी
>काँग्रेसने निवडणूक आयोगाचा अपमान केला – मोदी
>मंत्रीमंडळाचा निर्णय काँग्रेसने पत्रकार परिषदेत फाडला, मोदींकेड बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे हे लक्षात ठेवा – मोदी
>काँग्रेस सत्ता आपला हक्क असल्याचे मानते – मोदी
>55 वर्षांवर आमचे 55 महिने भारी – मोदी
>महागठबंधन म्हणजे महामिलावट, यापासून जनता दूर राहणार – मोदी
>काँग्रेसमध्ये प्रवेश करणे म्हणजे आत्महत्या करणे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय – मोदी
>स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करुन टाकण्याचं महात्मा गांधींनी म्हटलं होतं – मोदी
>वायूसेना दुबळी राहावी, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न, मी गंभीर आरोप करतोय – मोदी
>काँग्रेसमुक्त भारत ही केवळ माझी नाही, तर महात्मा गांधींची इच्छा होती – मोदी
>लंडनमध्ये ईव्हीएमवर संशय घेतल्याने देशाची नाचक्की – मोदी
>महागाईवर आधारित गाणी काँग्रेसच्या काळात कशी फेमस झाली – मोदी
>आमच्या कारवाईमुळे पळपुटे उद्योजक रडत आहेत – मोदी
>9 हजार पळवले आणि मोदींनी 13 हजार काढून घेतले म्हणून पळपुटे रडतात, मोदींचे मल्ल्याकडे बोट
>गरिबांना 10 टक्के आरक्षण देण्याची हिंमत फक्त आम्ही दाखवली – मोदी
>काँग्रेस काळात लष्कराची स्थिती दयनिय, त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक अशक्य – मोदी
संपूर्ण भाषण येथे ऐका –



























































