
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
तेलगू देसमसह इतर विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वासदर्शक ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार लोकसभेत सामोरे जात आहे. या दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून सरकारला चांगलेच धारेवर धरले. भाजप संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला. याला गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे –
मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला, एकूण ४५१ खासदारांनी आपल्या मतदानाचा हक्का बजावला. अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात ३२५ आणि अविश्वास प्रस्तावाच्या बाजून १२६ मते पडली. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव १९९ मतांनी फेटाळण्यात आला. मतदानावेळी एकूण ८४ खासदार अनुपस्थित राहिले. दरम्यान, संसदेचे कामकाज शुक्रवारी तब्बल १२ सुरू होते.
325 MPs voted ‘No’ 126 voted ‘Ayes’,#NoConfidenceMotion against NDA Govt rejected pic.twitter.com/Z77dX4zCZ7
— ANI (@ANI) July 20, 2018
पंतप्रधान मोदी यांनी भाषणाच्या शेवटी विरोधकांना २०२४ मध्ये पुन्हा अविश्वास प्रस्ताव घेऊन येण्याचे निमंत्रण दिले. मोदींच्या भाषणानंतर विरोधकांना गोधळ करत ते उत्तम अभिनेते असल्याचा आरोप विरोधकांना केली.
I thought for one and a half hours I was watching a Bollywood blockbuster film. I have no doubt PM would have been the best actor in the world: TDP MP Kesineni Srinivas on PM’s speech in Lok Sabha pic.twitter.com/naYWFdS1Qx
— ANI (@ANI) July 20, 2018
आम्ही महिलांच्या प्रगतीसाठी काम केले. तीन तलाकसारख्या मुद्द्यांवरून आमचे सरकार मुसलमान महिलांसोबत आहे. बेटी बचाओ, बेटी बढाओ हे अभियान चालवले. बालिकांवर अत्याचार करणार्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद आम्ही केली.
काँग्रेस काळामध्ये बँका लुटल्या गेल्या. काँग्रेसने देशाची अवस्था जर्जर करून टाकली. आपल्या आवडत्या व्यक्तिंसाठी देशातील बँकांचा खजाना रिक्त केला. काँग्रेसने देशाची अर्थव्यवस्था पोकळ करून टाकली. २००९ ते २०१४ बँका लुटण्याचा खेळ चालला होता. स्वातंत्र्यानंतर देशातील बँकानी कर्जरुपात दिलेली रक्कम १८ लाख कोटी होती परंतु २००८ ते २०१४ दरम्यान ती १८ लाख कोटींवरून ५२ लाख कोटी झाली.
मोदींनी आपल्या भाषणादरम्यान पी. चिदंबरम यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख केला. त्यावेळी चिदंबरम यांनी काँग्रेसविरोधात वक्तव्य केले होते. काँग्रेस बुडाली तर त्यांच्यासोबत जाणारेही बुडणार, असे मोदी म्हणाले. तसेच काँग्रेसमुळे तेलंगाना वाद निर्माण झाला. हिंदुस्थान-पाकिस्तान विभाजनही काँग्रेसचीच करणी असल्याचे मोदी म्हणाले.
देशात सत्तेमध्ये आम्ही नाही तर अस्थिरता असणार हा काँग्रेसचा मंत्र आहे. काँग्रेसकडून अफवा पसरवली गेली, खोटे पसरवले गेले. दलित, शोषित, पीडितांना घाबरवून राजकारण केले गेले. आंबेडकरांची थट्टा करणारे आंबेडकरांचे गुणगाण गात आहेत.
मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर बोलताना मोदी म्हणाले की, तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहणारा मी कोण? आम्ही कोण आहोत, आम्ही गरीब, मागासवर्गीय आहोत, तुम्ही नामदार आहात मी कामदार आहे. डोळ्यांचा खेळ हा सार्या देशाने पाहिला असे मोदी म्हणाले.
Aaj poora desh dekh raha tha TV pe aankhon ka khel, kaise aankhen kholi jaa rahi hain, kaise bandh ki jaa rahi hain: PM Modi in Lok Sabha pic.twitter.com/aZlsPGdIGa
— ANI (@ANI) July 20, 2018
विरोधकांनी राफेल विमानांच्या मुद्द्यावरून देशाला भरकटून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशाच्या लष्करप्रमुखांबाबत वाईट भाषेचा वापर करण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा पोरखेळ करण्यापासून वाचायला हवे असे मोदी म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विरोधकांनी सैन्याचा अपमान केला.
Just because of one careless allegation in the House on Rafale, both the nations had to release statements. We should not indulge in such childish behaviour: PM Modi in Lok Sabha pic.twitter.com/gnZhZ3kI25
— ANI (@ANI) July 20, 2018
डोकलामच्या विषयाबाबत माहिती नसेल तर बोलू नये. जे लोक डोकलामवर बोलत आहेत तेच चीनमध्ये जाऊन त्यांच्या राजदुताची भेट घेतात. तसेच देशाच्या लष्कराबाबत वाईट भाषेचा वापर केला गेला. यामुळे त्या जवानांना किती त्रास झाला असेल याचा आपण अंदाज बांधू शकत नाही.
One of the leaders spoke about #Doklam. The same leader, who believed the Chinese Ambassador over our forces. Where have we reached? Everything does not merit a childish conduct: PM Modi
— ANI (@ANI) July 20, 2018
You called the surgical strike a Jumla Strike. You can abuse me as much as you want but stop insulting the Jawans of India. I will not tolerate this insult to our forces: PM Modi in Lok Sabha #NoConfidenceMotion
— ANI (@ANI) July 20, 2018
आजकाल शिव भक्तिची चर्चा होत आहे. २०२४ ला तुम्ही पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणावा ही देवाचरणी प्रार्थना करतो, असे मोदी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हणाले. तसेच काँग्रेसला स्वत:वरच विश्वास नाही. यांचा इव्हीएम मशीन, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यासारख्या संस्थांवरही विश्वास नाही.
जेव्हा आम्ही डिजिटल युगाबाबत बोलतो तेव्हा संसदेत बसलेले लोकं म्हणतात, आपल्या देशातील लोकं अशिक्षित आहेत. या लोकांची हिच मानसिकता चुकीची आहे. अशा लोकांच्या गालावर जनतेने चांगला टोला लगावला आहे.
आमच्या विकास कामांवर विरोधकांचा विश्वास नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. गरिबांच्या आरोग्याची समस्या सोडवण्यासाठी आयुषमान भारत योजना देशभरात राबवली.
मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा प्रचंड गोंधळ, प्रचंड घोषणाबाजी
Uproar by TDP in Lok Sabha during PM Narendra Modi’s speech #NoConfidenceMotion
— ANI (@ANI) July 20, 2018
आम्ही येथे देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या आशिर्वादाने आहोत. विरोधकांनी हा प्रस्ताव ठेऊन या लोकांचा अपमान केला आहे. तसेच पंतप्रधान १५ मिनिटे उभे राहू शकत नाही अशी विरोधकांची टीका पण गेली ४ वर्षे आम्ही पाय रोवून उभे आहोत.
Main yahan khada bhi hun aur jo chaar saal kaam kare hain uspe adha bhi hun: PM Modi in Lok Sabha pic.twitter.com/ZuVeEQWo9R
— ANI (@ANI) July 20, 2018
अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की संसदेत अविश्वास प्रस्ताव का आणण्यात आला. ना संख्याबळ आहे ना संसदेमध्ये बहुमत. तरीही संसदेमध्ये अविश्वास प्रस्ताव का आणण्यात आला आहे, असे मोदी म्हणाले. तसेच खूर्ची मिळवण्याची घाई झाली आहे, असा टोला त्यांनी राहुल गांधी यांच्या झप्पीवर लगावला.
Kayioon ke mann ne yeh prashan hai ki #NoConfidenceMotion laya kyun gaya? Na toh sankhya hai, na sadan mein bahumat hai, phir bhi sadan mein is prastaav ko kyun laya gaya: PM Modi in Lok Sabha pic.twitter.com/yjnwwKJU3f
— ANI (@ANI) July 20, 2018
अविश्वास ठराव हे लोकशाहीतील मोठं शस्त्र असल्याचे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले. न मांझी , न रहबर ,न हक़ में हवाएं है कश्ती भी जर्जर ये कैसा सफ़र है अशी गझल त्यांनी म्हटली.
Na manjhi na rehbar, na haq mein hawayen, hai kashti bhi jarjar, ye kaisa safar hai: PM Modi in Lok Sabha on #NoConfidenceMotion
— ANI (@ANI) July 20, 2018
#PM Narendra Modi speaks in Lok Sabha on #NoConfidenceMotion https://t.co/uTCpXaa5uW
— ANI (@ANI) July 20, 2018



























































