मोदींचे देशाला ‘ऍप चॅलेंज’, आत्मनिर्भर ऍप्स इकोसिस्टम तयार करणार

804

टिकटॉकसह 59 चिनी अॅपवर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अॅप निर्मितीमध्ये आत्मनिर्भर बनण्याची योजना आखली आहे. त्यासाठी देशाला अॅप इनोव्हेशन चॅलेंज दिले आहे. नवीन आयडिया, नवे प्रोडक्ट असणाऱयांनी पुढे यावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. दरम्यान, अॅप तयार करणाऱयांमध्ये 2 लाखांपासून 20 लाखांपर्यंत बक्षिस देण्यात येणार आहे.

पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱयात हिंसक संघर्षानंतर कुरापतखोर चीनला धडा शिकविण्याची चिनी वस्तूंवर बहिष्कार मागणी देशभरातून होऊ लागली. त्यानंतर केंद्र सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. टीकटॉक या लोकप्रिय अॅपसह शेअर इंट, युसी बाऊजर, हॅलो, व्हायरस क्लिनर, झेंडर, डीयु क्लिनर आदी अॅप्स बॅन केले. त्यानंतर आता हिंदुस्थानातच अॅप निर्माण करण्यासाठी पाऊल उचलण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे.

काय आहे चॅलेंज
– ‘आत्मनिर्भर अॅप इकोसिस्टम’ तयार करण्यासाठी इनोव्हेशन चॅलेंज लाँच करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे आवाहन केले आहे.

18 जुलै शेवटची तारीख
– या अॅप चॅलेंज स्पर्धेत भाग घेण्यासाठी 18 जुलैपर्यंत अर्ज करावा लागेल. innovate.mygov.in यावर अर्ज करायचा असून, त्यासाठी Mygov Portal लॉगिंग करावे लागेल.
आठ विभागांसाठी बक्षिसे
– सोशल नेटवर्पिंग, इंटरटेन्मेंट, हेल्थ अँड वेल्थ, ऑफीस प्रोडक्टीविटी अँड वर्प फ्रॉम होम, बिझनेस, अग्रीटेक, फिटनेस, न्युज अँड गेम्स अशा आठ विभागात अॅप्स तयार करण्याची स्पर्धा आहे.
– निवडलेल्या अॅप्सला दोन लाखांपासून 20 लाखांपर्यंत बक्षिस देण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या