चीनमध्ये मोदींचे ’लालेलाल’ स्वागत

चीनच्या तियानजीन शहरात 31 ऑगस्टपासून होत असलेल्या 25 व्या शांघाय सहकार्य परिषदेला (एससीओ) उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पोहोचले आहेत. तियानजीन येथील विमानतळावर मोदींचे लाल गालिचा अंथरून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. हिंदुस्थान आणि चीन हे देश एकमेकांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत. सीमावादावरून अनेकदा दोन्ही देशांत खटके उडत असतात. गलवान खोऱयात 2020 साली दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला होता. अमेरिकेने भरमसाट टॅरिफ लावून दोन्ही देशांची केलेली नाकेबंदी आता हिंदुस्थान-चीनला अधिक जवळ आणण्याची शक्यता आहे. चीन दौऱयात मोदी व अध्यक्ष क्षी झिनपिंग यांची भेटही होणार आहे.