मोदींच्या पाच नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण ममता दीदींना विसरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

5 जानेवारी हा दिवस अनेक राजकीय नेत्यांसाठी खास दिवस आहे. कारण या दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर विविध राजकीय पक्षांच्या पाच वरिष्ठ नेत्यांचे वाढदिवस असतात. या नेत्यांपैकी काही जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पह्न करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर काहींना शुभेच्छा पत्रे  पाठवली. मात्र, ममता बॅनर्जींना मोदींनी शुभेच्छांसाठी फोन केला नाही की शुभेच्छा पत्रही पाठवले नाही.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा, डीएमकेचे नेत्या कनिमोळी, भाजपाचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कल्याण सिंह यांचा 5 जानेवारी रोजी वाढदिवस असतो.