India China Clash – पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व पक्षीय नेत्यांसोबत 19 जूनला बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
narendra-modi

लडाखमधील गलवान खोऱ्यात मंगळवारी हिंदुस्थानी जवान व चिनी सैनिक भिडले. या हाणामारीत हिंदुस्थानचे वीस जवान शहीद झाले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून रोजी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीला सर्व पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहतील.

‘हिंदुस्थैान चीन सीमेवरील परिस्थितीबातात चर्चा करण्यासाठी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे,. 19 जूनला सायंकाळी 5 वाजता ही बैठक व्हिडीओ क़ॉन्फरन्सिंगद्वारे होईल’, असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आले आहे.