
‘मुख्यमंत्र्यांसोबत स्वत:च्या केबिनमध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मोदीसाहेब नेहमी परचा आणि मास्क वापरत होते, मात्र त्याच दिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते. याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता,’ असा घणाघाती आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलताना पंतप्रधान मोदी भावुक झाल्याचे पाहण्यात आले. यावर बोलताना नवाब मलिक यांनी याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही व परचा का घालून आले नाहीत. ते खरंच भावुक झाले की ठरवून झाले, असा टोला त्यांनी लगावला.
मोदी सरकारविरोधात जनआक्रोश
देशात लाखोंच्या संख्येने लोकांनी आपला जीव गमावला. औषधोपचार मिळत नाहीत. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले. केंद्र सरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे असे नवाब मलिक म्हणाले.






























































