पंतप्रधान मोदी करणार सोशल मीडियाला रामराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-mobile

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या रविवारपासून सोशल मीडियाला रामराम करण्याच्या विचारात आहेत. तसे त्यांनी ट्विटरवर जाहीर केले आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू टय़ूबवरील आपली सर्वच अकाऊंट बंद करू इच्छितो, असे ट्विट करून त्यांनी त्यांच्या कोटय़वधी फॉलोअर्सना धक्का दिला आहे.

‘सोशल मीडिया’ हे पंतप्रधान मोदी यांचे प्रभावी शस्त्र्ा. त्याचा वापर करूनच ते पंतप्रधानपदी पोहोचले. त्यामुळे त्यांचा हा निर्णय आश्चर्यकारक म्हटला जात आहे. येत्या रविवारी ते यासंदर्भात आपला अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत. मोदी यांच्या ट्विटला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उत्तर देताना ‘मोदीजी द्वेष सोडा, सोशल मिडीया नको’ असा खोचक सल्ला दिला आहे.