मोदी हे जल्लाद, राबडी देवींचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुर्योधन म्हटल्यानंतर आता राबडी देवींनी पंतप्रधानांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदी हे जल्लाद आहेत, अशी वादग्रस्त टीका राबडी देवींनी केली आहे.

प्रियंका गांधींच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी राबडी देवींना विचारल्यावर त्यांनी ही टीका केली आहे. ‘त्यांनी दुर्योधन बोलून चुक केली. दुसऱ्या भाषेत बोलायला हवे होते. ते सर्व  तर जल्लाद आहेत जल्लाद. जे न्यायधीश, पत्रकारांची हत्या घडवून आणतात. त्यांचे अपहरण करतात. अशा माणसांचे विचार एकदम भयंकर असतील’, असे वक्तव्य राबडी देवींनी केले आहे.

याआधी प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाभारतातील दुर्योधनाशी केली होती. “देशाचे लक्ष विचलीत करण्याचे काम सध्या सुरु आहे. देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही. इतिहास याची साक्ष देतो, दुर्योधनाचा अहंकारही असाच गळून पडला होता”, असे प्रियांका गांधींनी म्हटले होते.