LIVE – 21 जूननंतर 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत लस मिळणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • करोनाविरोधातील लढाईत आपला विजय होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
  • काही राज्यात अनलॉकटी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, काळजी घेण्याची गरज आहे.
  • लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत सुरू राहणार
  • लसीसाठी राज्यांना पैसे खर्च करावे लागणार नाहीत
  • लसीकरणाची सर्व जबाबादारी आता केंंद्राकडे
  • 21 जूननंतर देशातील 18 वर्षांवरील स्रर्वांना मोफत लस देण्यात येणार
  • येत्या दोन आठवड्यात योजना बनवण्यात येईल.
  • राज्यांकडे देण्यात आलेली 25 टक्के जबाबदारीही केंद्र सरकार घेणार
  • 1 मे पासून राज्यांकडे काही जबाबदारी सोपवल्यावर यातील अडचणी राज्य सरकारलाही समजल्या.
  • लसीकरणाबाबत अनेक सूचना आल्या तसेच विविध प्रश्नही उपस्थित करण्यात आले.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी फ्रंटलाईन वर्करचे लसीकरण झाल्याने मोठा धोका टळला
  • जास्त धोका असलेल्या आणि फ्रंटलाईन वर्करला प्राधान्याने लस देण्यात आली.
  • राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रशासनाशी समन्वय साधत देशात वेगाने लसीकरण राबवण्यात आले.
  • आगामी काळात लसींचे उत्पादन वाढणार
  • सरकारने वैज्ञानिकांनी निधी देण्यासह सर्व सहकार्य केले.
  • कोरोनाविरोधातील लढाईत वैज्ञानिकांचे मोठे योगदान
  • त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.
  • सरकारने मिशन इंद्रधनुष्य सुरू केल्यानंतर देशातील लसीकरणाला वेग मिळाला आहे.
  • याआधी जगात लस बनल्यानंतर देशात येत होत्या. आता परिस्थिती बदलली आहे.
  • लस उपलब्ध आहेत. मात्र, गरजेपैक्षा उत्पादन कमी आहे.
  • या लढाईत मास्क, सामाजिक अंतर हे महत्त्वाची शस्त्रे आहेत.
  • या संकटामुळे ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात वाढली
  • कोरोनाला रोखण्यासाठी आपण आरोग्यसेवा उभारल्या.
  • कोरोनाविरोधातील लढाईत आपण अनेकांना गमावले आहे
  • देशाचा कोरोनाशी लढा सुरू आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. देशातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. तसेच देशातील कोरोना लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार, याबाबत जनतेत उत्सुकता आहे.