पश्चिम आशियाची परिस्थिती आमच्यासाठी चिंतेचा विषय; दोन्ही देशांनी शांतता ठेवावी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका व इस्त्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी दोन्ही देशांनी चर्चा करून तोडगा काढवा व शांतता राखावी असे आवाहन केले आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी याबाबत दोन्ही देशांना आवाहन केलं.

”पश्चिम आशियातील दोन देशात सुरू असलेल्या तणावाबाबत हिंदुस्थानची भूमिका कायम स्पष्ट आहे. आम्ही दोन्ही देशांना शांती आणि स्थिरता कायम ठेवायचे आवाहन करतो.. जेव्हा दोन लोकशाही असलेले देश एकत्र उभे असतात तेव्हा शांतीचा आवाज आणखी सशक्त होतो. पश्चिम आशियाची सध्याची परिस्थिती आमच्याासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. हिंदुस्थान चर्चा आणि डिप्लोमासीच्या माध्यमातून सर्व विवादांच्या समाधानाचे समर्थन करतो. या भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहोत. सर्व देशांसोबत मिळून आम्ही काम करू”, असे मोदींनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेत्यानाही यांना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना फोन करून त्यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी सध्या दोन्ही देशात सुरू असलेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्ती केली व सामान्य नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.