विद्यार्थ्यांसाठी मार्कशीट हे `प्रेशरशीट’; पालकांसाठी `प्रेस्टीजशीट’, पंतप्रधान मोदींनी दिला पाच `सी’चा कानमंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलांची बौद्धिक वाढ, बौद्धिक क्षमता ही केवळ प्रगतीपुस्तकातील गुणांवर मोजली जाऊ नये. सध्या तर मार्कशीट ही विद्यार्थ्यांसाठी प्रेशरशीट झाली असून पालकांसाठी मात्र प्रेस्टिजसीट बनली आहे असे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातर्गत ‘21 व्या शतकातील शालेय शिक्षण’ या विषयावरील संमेलनात पंतप्रधान मोदी बोलत होते. केवळ गुणांच्या आधारे बौद्धिक क्षमता मोजता येणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण ही शिक्षण बदलाची सुरुवात आहे.अद्याप काम पूर्ण झालेले नाही.ज्या भाषेत समजते त्या भाषेतच शिक्षण घेतले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.

फाईव्ह ‘सी’
21 व्या शतकात कौशल्य याला खूप महत्त्व आहे. त्यासाठी फाईव्ह ‘सी’ आवश्यक आहेत. क्रिएटिव्ह थिंकिंग, क्यूरोसिटी, क्रिएटिव्हिटी, कोलॅब्रेशन आणि कम्युनिकेशन असे पंतप्रधानांनी सांगितले.