समोश्याचा मोह मोदींनाही आवरेना; म्हणाले, कोरोनावर निर्णायक विजय मिळवू आणि एकत्र बसून खाऊ!

1828

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून समोश्याचा फोटो टाकला होता. चार जून रोजी होणाऱ्या बैठकीच्या निमित्ताने त्यांनी हा फोटो टाकला. ही बैठक समोरासमोर बसून झाली असती तर हा समोसा मी त्यांच्यासोबत शेअर केला असता असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले. याला आता मोदींनी उत्तर दिले आहे. कोरोनाविरुद्ध विजय मिळवल्यावर सोबत बसून समोसे खाऊ, असे उत्तर मोदींनी दिले आहे.

पंतप्रधान मोदींनी स्कॉट मॉरिसन यांचे ट्विट रिट्विट करून लिहिले की, हिंद महासागराशी जोडलेलो आणि समोश्याशी बांधील आहोत. समोसे स्वादिष्ट दिसत आहेत. कोरोनाविरुद्ध निर्णायक विजय मिळाला की सोबत बसून समोश्याचा आनंद घेऊ. 4 जूनला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भेटू, असेही मोदी म्हणाले.

मोदी शाकाहारी आहेत म्हणून…
याआधी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी समोश्याचे फोटो ट्विट केले होते. मोदींना टॅग करून स्कॉट मॉरिसन यांनी लिहिले की, रविवारच्या दिवशी ‘स्कॉ-मोसा’ आणि कैरीची चटणी बनवली. पण दुःख या गोष्टीचे आहे की मोदींसोबत या आठवड्यात होणारी बैठक व्हिडीओद्वारे होणार आहे. पीएम मोदी शाकाहारी आहेत, त्यांच्यासोबत समोसा खायची मजा आली असती.

आपली प्रतिक्रिया द्या