घराणेशाहीचा लोकशाहीला धोका, मोदींची काँग्रेसवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान एका संकटाच्या दिशेने चाललाय, ते म्हणजे घराणेशाही असलेला पक्ष. ‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली…’ हे लोकशाहीच्या विरोधात आहे. संविधान जे सांगते, त्याच्या नेमके उलट आहे. पिढयानपिढया एकाच घराण्याने पक्ष चालवणे हा लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नाव न घेता काँग्रेसवर टीका केली.

संसदेत 71 व्या संविधान दिन कार्यक्रमात मोदी बोलत होते. संविधान बनवताना देशहित सर्वोच्च स्थानी होते. पण आज संविधानाच्या मूल्यांना धक्का बसला आहे. देशापुढे घराणेशाहीचे संकट उभे राहिलेय. कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी राजकारणात येऊ नये असे मी म्हणत नाही. गुणवत्तेवर आणि जनतेच्या आशीर्वादाने अवश्य पुढे या, असे ते म्हणाले.