सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाची पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात

280

राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्यावतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला. यावेळी लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव, शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी श्रीमती उमा गोसावी, मुलगी उमंग गोसावी, नाईक नंदकुमार चावरे, सुभेदार संजयकुमार मोहिते, एनसीसी अधिकारी बाळासाहेब शिंदे, एनसीसी विद्यार्थी अमंग रुपेली, संकेत कदम, विजयश्री सुरदे, प्रीती जगदाळे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या