पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी देशवासियांशी संवाद साधणार, ट्विटरवर दिली माहिती

1161

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शुक्रवारी देशवासियांशी पुन्हा संवाद साधणार आहेत. शुक्रवारी सकाळी 9 वाजता एका व्हिडीओद्वारे नागरिकांना संदेश देणार आहेत. गुरुवारी
देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे..

देशात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याअगोदर दोन वेळा देशाला संबोधित केले आहे. तसेच ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारेही नागरिकांशी संवाद साधला आहे. आता तिसऱ्यांदा ते देशवासियांशी संवाद साधणार आहेत. लॉकडाऊन दरम्यान लोकांचे वर्तन, तसेच दिल्लीत झालेला धार्मिक कार्यक्रम आणि प्रशासनाचे काम याबाबत मोदी घोषणा करण्याची शक्यता आहे.

रुग्णांचा आकडा वाढला
दरम्यान, देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 328 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत 29 राज्यांमध्ये एकूण रुग्णांची संख्या 1965 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत 50 रुग्णांचा मृत्यू झाला. यातील गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या