
सामना प्रतिनिधी । मुंबई
आर्थिक कामकाज विभाग, अर्थ मंत्रालय, हिंदुस्थान सरकार आणि आशिया इफ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) यांच्यातर्फे मुंबईत २५ आणि २६ जूनला आशिया इफ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी)ची वार्षिक सर्वसाधारण बैठक होणार आहे. बैठकीत ‘पायाभूत सुविधांसाठी अर्थनिधी : नावीन्य आणि सहकार्य’ या विषयावर मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. २६ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल, अर्थसचिव सुभाषचंद्र गोयल उपस्थित राहणार आहेत



























































