पीएमसी बँक घोटाळा: बँकेच्या तिघा संचालकांना अटक

405

महाराष्ट्र ऍण्ड पंजाब (पीएमसी) बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी आणखी अटकेची कारवाई केली. चौकशीसाठी बोलावलेल्या तिघा संचालकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तसेच घोटाळ्यात त्यांचाही समावेश असल्याचे समोर आल्याने तिघा संचालकांना आज अटक करण्यात आली.

जगदीश मुखी, मुक्ती बाविसी आणि तृप्ती बने अशी त्या तिघा संचालकांची नावे आहेत. मुखी हे संचालकाबरोबर बँकेच्या ऑडिट समितीचे सदस्य होते. तर मुक्ती या संचालकाबरोबर बँकेच्या कर्ज आणि ऍडव्हानसेस समितीच्या आणि तृप्ती बने या बँकेच्या रिकव्हरी समितीच्या सदस्या होत्या. हे तिघे कार्यरत असताना बँकेने एचडीआयएल कंपनीला कर्ज वाटप केले होते. त्यामुळे मुखी, बने आणि बाविसी या तिघांनाही आज आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने चौकशीसाठी बोलावले होते, परंतु चौकशीदरम्यान या तिघांकडून कोणतेही समाधान कारक उत्तर मिळू शकले नाही. शिवाय कर्ज वाटप तसेच त्यासंबंधीच्या बाबींमध्ये या तिघांनी ढिसाळ कारभार करून एकप्रकारे बँकेच्या घोटाळ्याला चालना दिल्याने समोर येत असल्यामुळे पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. या तिघांनाही उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या