#PMC तपासात सहकार्य करतो, पण जामीन द्या! वाधवान यांची हायकोर्टाकडे विनवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी एचडीआयएलच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास आमची कोणतीही हरकत नाही. एवढेच काय तर तपासात सहकार्य करतो, पण आम्हाला जामीन द्या अशी विनवणी एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि आरोपी सारंग वाधवान यांनी आज मुंबई उच्च न्यायलयात केली. परंतु हायकोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांची मागणी फेटाळून लावली.

पीएमसी बँकेच्या खातेदारांचे पैसे लवकरात लवकर मिळावे यासाठी एचडीआयएलची मालमत्ता विकावी आणि त्यांची देणी चुकती करावी अशी मागणी करत ऍड. सरोश दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पंजाब ऍण्ड महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सारंग वाधवान आणि कंपनीचे विकासक राकेश वाधवान या दोघांना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.