हिरेव्यापारी निरव मोदीला न्यायालयाचा दणका; ‘ही’ संपत्ती होणार जप्त…

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोप हिरेव्यापारी निरव मोदीला न्यायालयाने दणका दिला आहे. पीएनबीचे सुमारे 13 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून निरव मोदी देशातून पळून गेला आहे. त्यामुळे निरव मोदीविरोधात तपास यंत्रणांनी पीएमएलए न्यायालयात धाव घेतली होती. पीएमएलए न्यायालयाने निरव मोदीची सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या संपत्तीत 1400 कोटी रुपयांच्या संपत्तीचा समावेश आहे. त्याच्या जप्त होणाऱ्या संपत्तीत पुढील काही मालमत्तांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

मुंबईतील वरळीमध्ये सी फेस भागात असलेल्या समुद्र महल या इमारतीत निरव मोदी आणि त्याची पत्नी एमी मोदी यांच्या नावे काही प्लॅट आहेत. ते जप्त होण्याची शक्यता आहे. त्यांची किंमत सुमारे 900 कोटींच्या घरात आहे. मुंबईतीलच कुर्ला पश्चिमेकडे कोहिनूस सिटीमध्ये तळमजला, तिसरा आणि चोथा मजला निरव मोदीच्या नावार आहे. त्याची किंमत 90 कोटी रुपये आहे. ही मालमत्ताही जप्त होण्याची शक्यता आहे. त्यावर सुमारे 9 कोटींचा कर थकवलेला आहे.

पेनिसुला बिजनेस पार्कमध्ये निरव मोदीची कमर्शियल प्रॉपर्टी आहे. सरकार ती प्रॉपर्टीही जप्त करू शकते. याची किंमत 79 कोटी रुपये आहे. पीएनबी घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्यासाठी निरव मोदीची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. निरव मोदीची कर्जतमधील 53 एकर जमीन, बिल्डिंगआणि मशीनरीही जप्त होणार आहेत. त्याची किंमत 70 कोटींच्या घरात आहे. त्याचप्रमाणे कर्जतमध्येच मीदीची 135 एकर जमीन आहे. त्याची किंमत 52 कोटी आहे. ही मालमत्ताही जप्त होऊ शकते. मफतलाल सेंटरमधील सहावा माळाही निरव मोदीचा आहे. ही मालमत्ताही जप्त होण्याची शक्यता आहे. त्याची किमत 55 कोटी आहे. मुंबईतील काळा घोडा परिसरात असलेले मोदीचे रिदम हाऊसही जप्त होऊ शकते. त्याची किंमत 32 कोटी रुपये आहे. ग्रासवर्नर हाऊसमध्येही मोदीचा फ्लॅट आहे. न्यायालयाच्या आदेशाने ही मालमत्ताही जप्त होऊ शकते. त्याची किंमत 17 कोटी आहे.

न्यायालयाच्या या आदेशापूर्वीही सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) मोदीची काही संपत्ती जप्त केली होती. मार्च 2020 मध्ये त्यातील काही संपत्तींचा लिलावही करण्यात आला होता. त्यातून 51 कोटींची वसूली झाली होती. या जप्त केलेल्या संपत्तीत रॉल्स लॉयल कार, एमएफ हुसैन आणि अमृता शेरगिल यांची चित्रे आणि डिझायनर हँडबॅग यांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या