
पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्याने जेष्ठ महिलेच्या पिशवीतील 74 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना 4 जानेवारीला दुपारी बाराच्या सुमारास वाघोली ते येरवडा गावठाण प्रवासादरम्यान घडली. याप्रकरणी 63 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मुलीसह 4 जानेवारीला वाघोलीतून येरवडा परिसरात बसने प्रवास करीत होत्या . त्यावेळी घरातील 74 हजार रूपये पिशवीत घेउन जात असताना, चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन रोकड चोरून नेली. बसमधून उतरल्यानंतर महिलेला पिशवीतील रोकड चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस अमलदार जगदाळे तपास करीत आहेत.



























































