नीरव मोदी ब्रिटनमध्येच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेत हिंदुस्थानातील सर्वात मोठा म्हणजे 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी हा ब्रिटनमध्ये आहे, याला त्या राष्ट्राने अधिकृत दुजोरा दिला आहे. मोदी याच्या तेथील वास्तव्याला ब्रिटनचा दुजोरा मिळताच त्याला हिंदुस्थानच्या हवाली करण्यासाठी सीबीआयने ब्रिटनला विनंती केली आहे.

चौकशी अधिकाऱ्यांचा सीडीआर नष्ट करू नका, हायकोर्टाचे सीबीआयला आदेश
घोटाळेबाज नीरव मोदी याची चौकशी करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांचा सीडीआर नष्ट करू नका, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज सीबीआयला दिले. नीरव मोदीच्या फायरस्टार इंटरनॅशनल या कंपनीच्या फायनान्स मॅनेजर या पदावर मितेन पांडय़ा काम करीत असून घोटाळय़ाप्रकरणी सीबीआयने त्याला 4 मार्च रोजी सकाळी ताब्यात घेतले होते. असे असतानाही सीबीआय कोर्टासमोर त्याला सादर करताना 5 मार्च रोजी सायंकाळी अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांकडून कोर्टात देण्यात आली. यावर आक्षेप घेत पांड्या याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तपास अधिकाऱयांचा कॉल रेकॉर्ड तसेच रजिस्टरवरील नोंद तपासण्यात यावी अशी मागणी पांड्या याने याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

अलाहाबाद बँकेच्या सीईओ उषा अनंथासुब्रह्मण्यन यांना जामीन मंजूर
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 14 हजार कोटींच्या घोटाळय़ाशी संबंधित असलेल्या अलाहाबाद बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उषा अनंथासुब्रह्मण्यन यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. या घोटाळ्याप्रकरणी अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत अनंथासुब्रह्मण्यन यांना तीन महिन्यांपूर्वीच सर्व पदांवरून बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईनंतर अनंथासुब्रह्मण्यन यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास राष्ट्रपतींनी नुकतीच मंजुरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनंथासुब्रह्मण्यन यांनी आज प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून जामीन अर्ज सादर केला.

summery- nirav modi is still britain says cbi