6,000mAh ची बॅटरी आणि 128GB स्टोरेजसह दमदार स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुचर्चित POCO M3 स्मार्टफोन अखेर लॉन्च झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर याचीच चर्चा होती. कंपनीने हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे.

Poco M3 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे, तर टॉप व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.

तीन रंगात उपलब्ध

काळा, निळा आणि पिवळा रंगात हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

xiaomi-poco-m3

फीचर्स

– 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले

– Qualcomm Snapdragon 662 प्रोसेसर

– तीन रिअर कॅमेरे

– 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आणि 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स.

– सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा.

– 6,000mAh ची बॅटरी, 18w चार्जिंग सपोर्ट

– साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर

images-9

किंमत

याची सुरुवातीची किंमत 129 डॉलर (जवळपास 10 हजार रुपये) आहे.

दरम्यान, हा फोन हिंदुस्थानमध्ये कधी लॉन्च होणार याबाबत कंपनी कडून माहिती देण्यात आलेली नाही. मात्र जागतिक बाजारात हा फोन आता लॉन्च लवकरच हिंदुस्थानमध्येही लॉन्च होण्याची आशा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या