कविता – ओंजळ

485

>> उषा उगवेकर-कोळंबकर, विक्रोळी

बाळासाहेब अनंतात विलीन
महाराष्ट्र झाला पोरका दीन
वटवृक्ष हा कोसळला
महाराष्ट्र धाय धाय रडला।।
जातपात नाही पाहिली
सामान्यांनाही सत्ता दिधली
सत्तेची तव नच आसक्ती
या सम हाच हीच खरी उक्ती।।
मराठी मनात स्फुल्लिंग पेटविले
मराठीसाठी तव जीवन झिजले
मराठी अस्तित्वासाठी लढले
लढता लढता अमर जाहले।।
तेवीस जानेवारी जयंती दिन
सतरा नोव्हेंबर पुण्यस्मरण
हिंदुहृदयसम्राट कसले गेले?
ते तर मराठी तनमनात भिनले।।
शांत झाला झंझावात
झाकोळला आसमंत
त्यांच्या जयंतीनिमित्त
वाहते ओंजळ भावफुलांची।।

 

आपली प्रतिक्रिया द्या