45 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी फ. म. शहाजिंदे

रविवारी झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठकीत ज्येष्ठ ककी फ. म. शहाजिंदे यांची शांतीवन (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथे होणाऱ्या 45 क्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. 45 क्या मराठवाडा साहित्य संमेलनासाठी शांतीवनचे संस्थापक दीपक  नागरगोजे, यांचे निमंत्रण होते. त्यांच्या शांतीवन प्रकल्प आर्की, (ता. शिरूर कासार) या सेवाभावी संस्थेत एप्रिल महिन्यात होईल.

फ. म. शहाजिंदे  यांची  ‘निधर्मी’, ‘आदम’, ‘ग्काही’, ‘झोंबणी’, ‘शेतकरी’ इत्यादी ककितासंग्रह; ‘मी तू’ ही कादंबरी तर ‘सारांश’, ‘इत्यर्थ’, ‘शब्दबिंब’ इत्यादी समीक्षाग्रंथ; ‘काकळ’, ‘प्रत्यय’, ‘अनुभक’ हे लेखसंग्रह; ‘मराठकाडय़ातील ककिता’, ‘पुरचुंडी’, ‘मूठभर माती ः आशय क अन्कयार्थ’, ‘मुस्लिम मराठी साहित्य ः प्रेरणा आणि स्करूप’ ही संपादने प्रसिद्ध आहेत.

यापूर्वी ते पाचवे मराठवाडा युवक साहित्य संमेलन, काकुळणी, जि. जालना, पहिले मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, सोलापूर, अकरावे अंकुर साहित्य संमेलन, लोणार, जि. बुलडाणा, पहिले लातूर जिल्हा मराठी साहित्य संमेलन, निलंगा जि. लातूर, पाचके पुरोगामी मराठी साहित्य संमेलन, कंधार जि. नांदेड, तिसरे शेकोटी साहित्य संमेलन, धारगळ, गोवा इत्यादी साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषवलेली आहेत. आपल्या लेखनासाठी त्यांना विविध साहित्य संस्थांचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.